जनतेज न्युज

गेवराई शहराला शुद्ध पाणीपुरवठा करा, नाहीतर आंदोलन छेडणार

प्रतिनिधि , बीड : गेवराई शहराला नगर परिषदेकडुन दुषीत पाणी पुरवठा होत असल्याच्या कारणावरून वंचीत बहुजन आघाडी व एमआयएम आक्रमक झाली आहे. शहरातील जनतेला नगर परिषदेकडुन दुषीत पाणीपुरवठा होत असल्याची बाब आम्ही त्यांच्या निदर्शनास आणुन दिली आहे. शहराला शुद्ध पाणीपुरवठा झाला नाही तर वंचित बहुजन आघाडी व एमआयएम च्या वतीने नगरपरिषदेसमोर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्षांनी दिला आहे.

तर हे सर्व आरोप नगर परिषदेच्या नगराध्यक्षांनी फेटाळून लावले असुन, आम्ही शहराला शुद्ध व चांगला पाणीपुरवठा करत असल्याचे सांगितले आहे. आम्ही तरीही सर्व पाणी पुन्हा तपासणीसाठी पाठवुन पाण्यातील क्षारांची तपासणी करु असेही नगराध्यक्ष यावेळी म्हणाले.