प्रथिनिधी, कल्याण : कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत असताना आता उंबर्डे येथे उभारण्यात आलेल्या कचरा प्रकल्पात आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.वाडेघर डम्पिंगवरील भार कमी करण्यासाठी केडीएमसीच्या वतीने ठिकठिकाणी कचरा वर्गीकरण प्रकल्प आणी कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहेत. उंबर्डे येथे कचरा वर्गीकरण प्रकल्प उभारण्यात आला असून दररोज याठिकाणी हजारो टन कचरा वर्गीकरणासाठी येत असतो. आज दुपारी दीड ते दोन च्या सुमारास येथील साठवून ठेवलेल्या कचऱ्याला अचानक आग लागली काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले व सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले या आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल होऊन अग्निशामक जवानी आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहे. तब्बल दोन तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविले असून अजूनही काही परिसरात आग लागलेली आहे सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले आहे.
