जनतेज न्युज

सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात 138 धाडीतून कोट्यावधी रुपयांचा गुटखा आणि तंबाकू जप्त.

प्रतिनिधी, सोलापूर : राज्यात गुटखा बंदी आहे.असे असताना देखील गुटखा आणि सुगंधित तंबाकूची विक्री होत असल्याचे पुढे येते. सोलापुरात यास लगाम लावण्यासाठी अन्नऔषध प्रशासन आणि पोलीसांनी छापे टाकून गुटख्याचा साठा जप्त केला आहे. अन्न औषध प्रशासन, शहर आणि ग्रामीण पोलीस प्रशासनाने वर्षभरात एकूण 138 धाडी टाकून 3 कोटी 94 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 105 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, 80 आस्थापना सील करण्यात आल्या आहेत , अशी माहिती अन्नऔषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली आहे.सोलापूर ग्रामीण पोलिसांनी नुकतीच मोठी कारवाई केली आहे.पावणे दोन कोटींचा गुटखा आणि तंबाकू साठा यामध्ये सोलापूर हद्दीत जप्त करण्यात आला होता.सोलापुरात गेल्या वर्षभरात कोट्यावधी रुपयांचा बेकायदेशीर तंबाकू आणि गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे.

आज ‘वर्ल्ड नो टोबॅको डे’ असल्याने अन्नऔषध प्रशासनाच्या वर्षाभरातील कामागिरीच सोलापुरात सर्वत्र कौतुक केल जात आहे.