प्रतिनिधी, सोलापूर : तीन वर्षांपूर्वी पश्चिम बंगाल येथून मुलासह बार्शी येथे राहण्यास आलेली महिला मुस्लिमा लुथफार सरदार हिचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना घडली आली आहे.
कामाला जाण्याच्या कारणावरून झाला वाद .याबाबत शहर पोलिस निरीक्षक सारिका गटकुळ यांनी शकिर हुसेन शेख याच्या विरोधात तक्रार देताच खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या आरोपी फरार झाला आहे. पश्चिम बंगाल येथून नवऱ्याला सोडून लुथफार हीं मुलासह बार्शीत आल्यानंतर मिस्त्री काम करणाऱ्या शकिर हुसेन शेख सोबत राहू लागली.कांही दिवसांनी या दोघांचे खटके उडायला सुरुवात झाली.
त्यामुळे आरोपी आणि मागच्या कांही दिवसांपासून एकत्र राहत नव्हते. मात्र, एकमेकांच्या वादच रूपांतर भांडणात होऊन शेवटी लुथफार ला जीव गमवावा लागला आहे.शेजाऱ्यांनी घरातील वाद ऐकून घरात प्रवेश केला असता लुथफार बेशुद्ध अवस्थेत आढळली.आणि दवाखान्यात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपार करीत आहेत.
