जनतेज न्युज

कल्याण पश्चिम शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर नॉट रीचेबल

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : विधान परिषद निवडणूक निकालानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नॉट रीचेबल झाल्यांनतर त्यांच्या खास मर्जीतील कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर हे देखील नॉट रीचेबल झाले आहेत . आमदार भोईर यांचा मोबाईल स्विच ऑफ असून कुटुंबियांशी संपर्क साधला असता आमदार कुठे आहेत हे आपल्याला माहीत नसल्याचे सांगण्यात आले.मात्र खास सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार काल झालेल्या विधान परिषद निवडणुकी नंतर आमदार भोईर हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेतच असल्याचे कळते. दरम्यान कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिक सकाळ पासून राजकीय घडामोडीकडे लक्ष लावून बसले आहेत. तर दुसरी कडे कल्याण पोलिसांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला आहे.