सेंटर सुरू झाले नाहीतर दिला उपोषणाचा इशारा !
प्रतिनिधी, कल्याण : कल्याण पूर्वेतील डायलिसिस सेंटरचे उदघाटन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले.१७ फेब्रुवारी रोजी या डायलिसिस सेंटरचे लोकार्पण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच हे सेंटर बंद असल्याचे डायलिसिस करण्यासाठी येणाऱ्या पेशंट कडून सांगण्यात आले.यासंदर्भात तक्रारी आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी यांच्याकडे वारंवार येत असल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने आज बंद असलेल्या डायलिसिस सेंटर बाहेर आंदोलन करण्यात आले.
डायलिसिस सेंटरचे लोकार्पण झाल्यानंतर माध्यमांन मध्ये बातम्या आल्या डायलिसिस सेंटर सुरू झाले.त्यामुळे डायलिसिस चे रुग्ण याठिकाणी आल्यावर सेंटरला ठाळे असल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असे.कल्याण डोंबिवलीतील
नागरिकांना फसवण्यासाठी हे सेंटर उघडलं आहे का.असा सवाल यावेळी आम आदमी पार्टीचे कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष धनंजय जोगदंड यांच्याकडून करण्यात आला आहे.तसेच लवकर हे डायलिसिस सेंटर सुरू करावे अन्यथा उपोषण करू असा इशारा आम आदमी पार्टी कडून देण्यात आला आहे.
