प्रतिनिधी , मुंबई : आज पासून काही ठराविक वेळेत सर्वसामान्य प्रवाश्यांना रेल्वेत प्रवास करत येईल. साध्या कल्याण आणि डोंबिवली स्टेशन हुन प्रवाशी लोकल मधून प्रवास करत आहेत. गर्दी नाही आहे. सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. कल्याण ते बदलापूर आणि कल्याण कसारा 84 किलोमीटर ची हद्द कल्याण जीआरपी अंतर्गत येते प्रत्येक स्थानकात आरपीएफ आणि जीआरपी पोलीस तैनात आहेत. कल्याण जीआरपी चे 190 पोलीस कर्मचारी आणि 15 अधिक्कारी यांची ड्युटी लावण्यात आली आहे. सर्वसामान्य प्रवाश्यांनी शासनाने ठरवलेले जी वेळ आहे, त्यावेळेत प्रवास करावा असे आवाहन कल्याण जीआरपी वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांनी केलं आहे..
