प्रतिनिधी, नाशिक : कांद्याच्या घसरत्या बाजार भावामुळे प्रहार संघटनेच्या वतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला भाव मिळावा या संदर्भात आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्यांचे स्वाक्षरी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणार आहे.
नाशिक जिल्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याचा जिल्हा असून गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. मात्र याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असून 30 रुपये कांद्याला भाव द्यावा तसेच ज्या शेतकऱ्यांचा कमी भावाने कांदा विकला गेला आहे, अशा शेतकऱ्यांना क्विंटलला 1 हजार रूपये अनुदान द्यावे, अशा मागणी करीता शेतकऱ्यांनी आपल्या स्वाक्षरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून पाठवणार आहे.
