प्रतिनिधी , नागपूर : संपूर्ण देशात येत्या २६ जुलै ला कारगिल विजय दिवस ची २२ वीं वर्षगांठ साजरी केले जाणार असून यानिमित्ताने सिटीजन सोसायटी आफ इंडिया तर्फे श्रद्धांजली कलश कर्नाटक वरून दिल्लीला राजधानी एक्सप्रेस ने नेण्यात येत आहे । हे कलश आज नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचले असता नागपूर महापालिका तसेच जिल्हा प्रशासनातर्फे कलशाला अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली । शहीद कलशाला नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते । यावेळी महापौर, उपमहापौर , जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आणि भारत माता की जय च्या घोषणा दिल्या ।
देशभरातील विविध 27 नद्यांचे पवित्र जल आणि देशभरातील विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या विविध फुलांच्या पाखळ्या या शहीद कलशात ठेवण्यात आल्या असून येत्या 26 जुलै ला कारगिल विजय दिवस निमित्त हे पवित्र जल आणि फुलांच्या पाखळ्या शहिदांच्या स्मारकावर अर्पण करण्यात येणार आहे । शहीद कलश नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचताच उपस्थित प्रवाशांनीही शहिदांच्या स्मरणार्थ घोषणा दिल्या आली कलशाचे पूजन केले
