जनतेज न्युज

आंबेघर ता पाटण येथील दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याचे पालकमंत्री यांनी केले जाहीर

प्रतिनिधी , सातारा : पाटण तालुक्यातील आंबेघर येथील घरावर अतिवृष्टीमुळे डोंगर खचला आणि अत्यंत दुर्देवी घटना घडली त्या घटनेत आत्तापर्यंत ११ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे
सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे अद्याप ही बचावकार्य सुरू असून गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे