प्रतिनिधी , औरंगाबाद : बीडच्या माजलगाव मधल्या सुर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका नराधमाने अत्याचार केला आहे. सदरील प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. माञ आरोपीच्या चौकशीसाठी पोलिसांनी PCR ऐवजी MCR दिलं आहे. त्यामुळे या कारवाईवर एमआयएमने आक्षेप घेत आरोपीच्या फाशीची मागणी केली आहे.
एमआयएम महिला प्रदेशाध्यक्ष आसमा शेख यांनी बिड येथील अत्याचार झालेल्या मुलीची भेट घेतली.संबंधित प्रकरण ताब्यात असलेल्या पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित होतो. अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीला न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात न्याय मागणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. आरोपी कोणत्याही समाजाचा असो आम्ही न्यायासाठी संघर्ष करणार आहे. या प्रकारामुळे पीडित कुटुंब भयभीत असून त्यांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आलीय.
