प्रतिनिधी , कोलापूर : बोगस कागदपत्रांच्या आधारे..कोल्हापुरातील कोडोली येथील ख्रिस्ती समाजाची जागा हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दि इंडियन कॅनेडियन मिशनच्या दिपक गायकवाड यांच्यासह प्रांत अजय पवार आणि भूमी अभिलेख अधीक्षक सुनील नाळे यांच्यावर कारवाई करावी.. या मागणीसाठी आज कोल्हापुरात ख्रिस्ती समाजामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले…
दोषींवर लवकर कारवाई करावी.. अन्यथा सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला..
कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली येथील कोईमार ट्रस्ट आणि कोल्हापूर चर्च कौन्सिल यांच्या मालकीची जागा आहे… दिपक नामदेव गायकवाड यांनी या जागेची बोगस कागदपत्रे बनवून पन्हाळ्याचे प्रांत अधिकारी अजय पवार आणि भूमी अभिलेख सुनील नाळे यांच्याशी संगनमत करून दि इंडियन कॅनेडियन मिशनच्या नावाने नोंद करून जागा हडपण्याचा प्रयत्न करत आहे…तसेच सामाजिक वापरात असलेली ही जमीन सत्ता प्रकारात मागणी नसताना.. गायकवाड यांच्याशी संगनमत करून जागा लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या.. पन्हाळ्याचे प्रांत अधिकारी अजय पवार आणि भूमी अभिलेख सुनील नाळे यांना निलंबित करावे..यासह दिपक नामदेव गायकवाड याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी.. या मागणीसाठी जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले…दहा दिवसांत दोषींवर कारवाई करावी.. अन्यथा सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला…
