प्रतिनिधी , कोलापूर : कोल्हापूर- जिल्ह्यात दुसऱ्या कोरोना लाटेची शक्यता वर्तवली जात असून जिल्हा परिषदेकडून नियोजन सुरू आहे. डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये दुसरी लाट येऊ शकते. त्यामुळे
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून अतिरिक्त बेडच नियोजन सुरू झाले आहे. दिवसाला तेराशे ते चौदाशे रुग्ण सापडण्याची भीती व्यक्त केली जात असून व्हेंटिलेटर,ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यासह खाजगी रुग्णालयांशी आरोग्य विभागाचा संपर्क सुरु आहे.
खबरदारी म्हणून उपाययोजना करत असल्याची मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ही माहिती दिली आहे.
