जनतेज न्युज

किनगाव येथून सिरीयल किलर जेरबंद ; तीन वृद्ध महिलांचा केला होता खून

प्रतिनिधी, जळगाव : पैसे आणि दागिन्यासाठी तीन वृद्ध महिलांचा खून करणारा सिरीयल किलर मुकुंदा उर्फ बाळू बाबूलाल लोहार वय वर्ष 30 राहणार चौधरी वाडा किनगाव तालुका यावल याच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखे पथकाने किनगाव येथून मुस्क्या आवळले आहेत, त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ,किनगाव येथील माराबाई कोळी, द्वारकाबाई सुरवाडे, रुक्‍माबाई पाटील या तीन वृद्ध महिलांचा खून झाल्याने किनगाव हादरले होते, योगायोग म्हणजे या तिन्ही सत्तर वर्षाच्या होत्या ,आणि तिघींच्या रुमालाने गळा दाबून खून करण्यात आला होता, गेल्या पंधरा महिन्यात हे तीन खून घडले होते.