जनतेज न्युज

किनवट तहसील दाराकडून आदिवासी महिलेला मिळाली अपमानास्पद वागणूक..

प्रतिनिधी , नांदेड : वारसाहक्काने माझ्या आईची जमीन मला मिळावी म्हणून अरूणाबाई देवराव भुसारे ही आदिवासी महिला गेलेल्या दोन महिण्यापासुन सतत तहसील कार्यालयाचे उंबरवठे झिजवित किनवट तहसिलदाराकडे न्याय मागण्यासाठी गेली असता या आदिवासी पिडीत महिलेला किनवट तहसीलदाराकडुनच अपमानास्पद अश्लील वागणूक मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय..
अरूणाबाई देवराव भुसारे ही आदिवासी महिला आपल्या मुलांसमवेत कुपट्टी येथे दोन खोल्या असलेल्या मोडक्या-तोडक्या पतराच्या घरामध्ये आपल्या संसाराचा गाडा हाकत असतांनाच वारसा प्रमाणे यांच्या आईच्या नावे असलेल्या जमीनीच्या सातबारा व फेरफारवर खाडाखोड करून भागाबाई यादव हे नाव टाकून जमीन हडपण्याचा प्रकार उघडकीस आल्याने अठरा विश्व दारिद्र असलेल्या अरूणाबाई देवराव भुसारे यांनी आपल्या आईच्या नावे असलेली जमीन वारसाहक्का प्रमाणे माझ्या नावे करूण द्यावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे केली असता तहसीलदारानी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जा असा सल्ला दिल्याने अरूणाबाई भुसारे यांनी तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे अपील केल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सदर महिलेच्या बाजूने निकाल देवून तहसीलदारास अंमलबजावणीचे आदेश दिले.
पण अद्यापपर्यंत या आदिवासी महिलेला न्याय न मिळाल्याने ही आदिवासी महिला तहसीलदारांकडे गेली असता या महिलेला अशिल अपमानास्पद वागणू मिळत असल्याचे अरूणाबाई भुसारे यांनी सांगितले.