प्रतिनिधी, पुणे :
- ज्या कोणाचे सरकार येईल त्यांनी सामान्य माणसांचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, कष्टकऱ्यांचे, समाजाचे प्रश्न सोडवले पाहीजे.
- जे काही गेल्या पंधरा दिवसात घडलंय ते बरोबर नाही आहे.
- मला राज्यसभेला पुरस्कृत उमेदवारी दिली असती तर हा खेळखंडोबा घडलाच नसता.
- पण तुम्हाला आलेली संधी ही गरिबांसाठी काम करायला, मराठी लोकांसाठी सुवर्ण संधी आहे.
- या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राचं नाव हे देशभर कसं पोहोचवता येईल. याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचं आहे.
- कुठे जायचं कुठे नाही हा शिवसेनेचा वैयक्तिक अधिकार आहे.
- मला त्या राजकारणात पडायचं नाही. शेतकरी आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन काम करावं एवढीच माझी सरकारकडे इच्छा आहे.
- महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे.
