जनतेज न्युज

कुस्ती खेळण्याचा मोह खासदारांना अनावर

प्रतिनिधी, वर्धा : विदर्भ केसरी स्पर्धेच्या अनुषंगाने खासदार रामदास तडस यांनी स्वतः विद्यार्थ्यांचा घेतला सराव

देवळीतील स्टेडियम मध्ये मुलांकडून विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचा सराव सुरू होता ते पाहण्यासाठी खासदार रामदास तडस अचानक स्टेडियमवर गेले होते.त्यावेळी ते स्वतः कुस्तीगीर असल्याने त्यांना सरावात भाग घेण्याचा मोह आवरला नाही.त्यावेळी थेट खासदार रामदास तडस हे आखाड्यात उतरले आणि त्यांनी सराव करत असलेल्या मुलांना डावपेच शिकवले,यावेळी उपस्थितांना त्यांच्या मधील कसलेला कुस्तीपटूही पाहायला मिळाला.