प्रतिनिधी , सांगली : कृषी कायद्याचे समर्थन करणाऱ्या आ. सदाभाऊ खोत यांनी कडकनाथ घोटाळ्यातील गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा मगच आत्मनिर्भर यात्रा काडावी अशी टीका स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली.
केंद्राच्या कृषी धोरणाचे समर्थन करणाऱ्या सदाभाऊ यांनी हा कायदा एकदा डोळ्याखालून घालावा या कायद्यात कॉन्ट्रॅक्ट फर्मिंग चे ही एक विधेयक आहे कडकनाथ कुक्क ट पालन हाही कॉन्ट्रॅक्ट फर्मींग होते या कडकनाथ स्कीम मुळे शेतकऱ्याचा फायदा झाला की तोटा झाला हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा पुणे सह मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच उध्वस्त झाले अनेकांनी आत्महत्या केल्या जमिनी गहाण ठेवून,दागदागिने विकून लाखो रुपये शेतकऱ्यांनी गुंतविले ,शेतकऱ्यांना काय मिळाले, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग फायद्याचे आहे हे कोणत्या तोंडाने सदाभाऊ शेतकऱ्यांना सांगणार हा आमचा सवाल आहे त्याचबरोबर शेतकरी आणि ऊद्योगपती यांच्यात करार झाला आणि संबधित कंपनीने शेतीमाल नेला नाही तर हा वाद प्रांत आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे सोडवायचा आहे त्यांनीही शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर न्यायालयात जाण्याची तरतूद नाही याचा अर्थ पैशाच्या जोरावर उद्योगपती प्रशासकीय अधिकाऱ्यांना मनेज करतील आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावतील हेच यातून स्पष्ट होते आहे. यावरून हा कायदा सरळ सरळ उद्योग पतीचे हित साधणारा आहे . खासगी बाजार समित्या काढायला आमचा विरोध नाही पण आहे त्या बंद पाडणे हा उपाय नाही. त्यामुळे सदाभाऊंनी यात्रा काढण्यापेक्षा कायदा शेतकरी हिताचा होईल यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा आम्हीही कडकनाथ घोटाळ्यात गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना घेवून कडकनाथ यात्रा काढू आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या सभेत कोंबड्या उधळू असा इशाराही स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.
