जनतेज न्युज

केंद्र व राज्य सरकार च्या कामगार विरोधी धोरण्याच्या निषेधार्थ महिला कामगारांचां मोर्चा

प्रतिनिधी, सांगली : केंद्र व राज्य सरकार च्या कामगार विरोधी धोरण्याच्या निषेधार्थ सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या नेतृत्वाखाली हमाल, तोलाईदार, हळद महिला कामगारांचां जिल्हा माथाडी मंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष कामगार नेते साथी विकास मगदुम ,बाजार समिती चे मा.संचालक बाळासाहेब बंडगर यांनी केले.औद्योगिक, उद्योग क्षेत्रामधुन माथाडी कायद्या वगळु नका,केंद्र सरकारने ४४ कामगार कायदे रद्द करुन चार कामगार कायदे केले सदरच्या कामगार कायदे राज्य सरकारने लागु करु नयेत, माथाडी मंडळाकडील रिक्त निरीक्षक पदे, अधिकारी, कर्मचारी यांच्या रिक्त जागी गेल्या दहा वर्षांत भरती केली नाही सदरची भरती त्वरित करावी, सदरच्या कर्मचारी भरती मध्ये नोंदणी कृत माथाडी कामगारांच्या मुला मुलींचीं गुणवत्ते नुसार प्राधान्याने भरती करावी, जिल्हा माथाडी मंडळावर कायद्यातील तुरतुदी नुसार हमाल व मालक प्रतिनिधीचीं शासन नियुक्त सदस्य म्हणुन नेमणुका करा, माथाडी कामगारान साठी घरकुल योजना सुरु करा, माथाडी मंडळा मार्फत मोफत वैद्यकीय उपचार सुविधा सुरु करावी, या मागण्याचें निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मार्केट यार्ड पासुन सुरवात होवुन हा मोर्चा माथाडी मंडळ कार्यालयावर आला त्यांनतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी बाळासाहेब बंडगर, संजय मोरे, प्रल्हाद व्हनमाने, नामदेव हिप्परकर, कामगार नेते विकास मगदुम यांनी मार्गदर्शन करुन आंदोलनाची भुमिका मांडली.