प्रतिनिधी , पंढरपूर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकामध्ये कुठलीही तडजोड करू नये या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष , माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत शनिवारी मुंबईच्या आझाद मैदान येथे निदर्शने करणार आहेत. गेली पाच दिवस झालं पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन पुकारलय. केंद्राने मंजूर केलेले कृषी विधेयके शेतकरी विरोधी विरोधी असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र महाराष्ट्रातली मोठी शेतकरी संघटना समजली जाणारी रयत क्रांती संघटनेने या कृषी विधेयकाचे समर्थन केले आहे. सत्तर वर्ष शेतकऱ्यांच्या पायामध्ये काँग्रेसने बेड्या घातल्या होत्या. भाजप सरकारने हे कृषी विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांना मुक्त स्वातंत्र्य दिले आहे. मात्र काँग्रेस आणि काही डावे पक्ष हे शेतकऱ्यांना पुढे करून आपली पोळी भाजत असल्याचा आरोप यावेळी सदाभाऊ खोत यांनी केला आहे. केंद्र सरकारने कसल्याही परिस्थितीमध्ये या विधेयकामध्ये कोणतीही वाढीव तरतूद करू नये किंव्हा तडजोड करू नये या मागणीसाठी शनिवारी आता रयत क्रांती संघटना मैदानात उतरत आहे.
