जनतेज न्युज

केंद्रातील कृषी कायद्याला विरोध करत समाजवादी पक्षाचे उद्याच्या भारत बंदला पाठिंबा.

प्रतिनिधी , धुळे : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिलेश यादव यांनी राज्यात किसान यात्रा करत आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं. संपूर्ण राज्यातील जनतेने या नव्या कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरावे आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले होते.
आज समाजवादी पक्षाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने लागू केलेले कृषी विधायक मागे घेण्यात यावे, या करिता केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार घोषणबाजीही करण्यात आली. तसेच उद्याच्या शेतकरी संघटनांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेला साथ देत समाजवादी पक्षाचा पाठिंबा जाहीर केला आहे.