जनतेज न्युज

सारथी तारादूत आंदोलन तापणार…..

प्रतिनिधी , पुणे : छत्रपती संभाजीराजे व मराठा क्रांती मोर्चा यांनी देखील महाराष्ट्र शासन यांचे सोबत झालेल्या बैठकीत सारथी तारादुत बाबतीत आग्रही भूमिका मांडली होती. तेव्हा सरकार म्हणाले होते की सारथी संस्था प्रस्ताव पाठवेल परंतु सारथी चे अध्यक्ष व सदस्य तसा प्रस्ताव पाठवायला तयार नाही.
सारथी संस्था & तारादूत & मराठा क्रांती मोर्चा समन्वयक यांची बैठक निष्फळ
सारथी संस्थेला स्वायत्ता पुर्ण नाही. आम्ही तारादुत बाबतीत निर्णय घेऊ शकत नाही असे :- अजित निंबाळकर
तारादूत व मराठा क्रांती मोर्चा यांनी सारथी संस्थेच्या माध्यमातून तारादूत प्रस्ताव पाठवविणार का विचारलं असते आम्ही प्रस्ताव पाठवणार नाही सांगितले.
शासनाने सारथी संस्था ला स्वायत्ता देताना आर्टिकल २५ च्या माध्यमातून निर्णय घेण्याचे अधिकार काढल्याचे व्यवस्थापकीय अधिकारी काकडे यांनी सांगितले आहे.
तारादूत व मराठा क्रांती मोर्चा यांनी निवेदन दिले नाही. जोपर्यंत निर्णय घेणारा अधिकारी येत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
७/१२/२०२० रोजी दुपारी सारथी डायरेक्टर बॉडी सोबत पोलिस प्रशासनाने बैठक घडवून आणली.