जनतेज न्युज

केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांविषयी असवेदनशील; अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे यांचा आरोप.

किसान सभेचे शेतकऱ्यांसह नाशिकहून दिल्लीकडे कूच…

प्रतिनिधी , धुले : केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभाग घेण्यासाठी नाशिक शहरातून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकरी वाहन मोर्चाने दिल्लीच्या दिशेने कूच करत आहे. या मोर्चात बससह जीप, व्हॅन, मालवाहतूक वाहने आहेत. शेतकऱ्यांसह कामगारांचाही मोर्चात मोठय़ा प्रमाणावर सहभाग आहे. आज हा मोर्चा दिल्लीकडे रवाना होत असताना धुळे शहरात ठीक ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, शेतकऱ्यांचे हे आंदोलन आता शेतकऱ्यांन पुरते मर्यादित नसून ते आता देशातील प्रत्येक नागरिकांचे आंदोलन आहे. पुढे बोलताना सांगितले की, या आंदोलनात 33 आंदोलनकर्ते शहीद झाले आहे, परंतु नरेंद्र मोदी सरकार या बाबत अजिबात संवेदनशीलता दाखवत नाही.

ह्या आंदोलनालाजर मध्यप्रदेश मधील भाजपा च्या शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारने अडवण्याचा जर प्रयत्न केला तर, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतकरी मावळे आहेत, आम्ही त्यांचे सर्व अडथळे पार करून दिल्ली पोहचल्या शिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया डॉ.अशोक ढवळे यांनी दिली.