जनतेज न्युज

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेची गाढवावर धिंड निषेध व पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात तेल्हारा येथे शिवसेनेचे आंदोलन

प्रतिनिधी , अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका येथे सतत होत असलेली पेट्रोल व डिझेल दरवाढ व शेतकरी विरोधी वक्तव्य करणारे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेचे गाढवावर धिंड तेल्हारा शहरातील टावर चौकात ते तुकाराम चौक येथे काढण्यात आली यावेळी टावर चौकात शिवसेना व युवासेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेतकरी आंदोलना विषयी आक्षेपार्य विधान करणारे रावसाहेब दानवे व केंद्र शासनाच्या पेट्रोल व डिझेल दरवाढ चा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते