प्रतिनिधी , कोकण : कोकण रेल्वेमार्गाच्या सध्या विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असताना कोलाड, माणगाव, इंदापूर, गोरेगाव या रेल्वे स्थानक परिसरात गेल्या सात महिन्यां पासून मोठ्या प्रमाणात हायटेन्शन वायरची चोरी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत रेल्वे पोलीस तसेच रायगड पोलीसांकडून अनेकदा गस्त घालूनही चोरटे सापडत नसल्याने आव्हान निर्माण झाले होते माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला असता पाच जणांना रंगेहाथ पकडण्यात यश आल्याने एका टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलीसांना यश आले आहे जिल्ह्यासह कोकण रेल्वेमार्गावरील अन्य ठिकाणी देखील याच टोळी जवळ संबंधित चोरट्यांनी या महागड्या वायरची चोरी केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
