जनतेज न्युज

भर रस्त्यात बेदम मारहाण करत लुबाडणारी दुकली गजाआड

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याण महात्मा फुले पोलीस स्थानकाच्या हद्दीत इंदिरानगर परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास एका इसमाला दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी अन्सारी यांना हटकले. चाकूचा धाक दाखवत त्यांना मारहाण करत व या इसमाजवळील मोबाईल व रोकड हिसकावून धूम ठोकली .या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असता पोलिसानी या चोरट्यांचा शोध सुरु केला .पोलिसांकडे फक्त या मधील एका चोरट्याने निळा शर्ट घातल्याची माहिती होतीं.या माहितीच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत प्रवीण चव्हाण आणि विकास टेमघरे या दोघा चोरांना अटक केली .