प्रतिनिधी , औरंगाबाद : काही लोक कोरोनाबाबत नाहक राजकारण करत आहेत. शिवजयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला तर काही जण शिवजयंतीला बंधन का आणता अशी टीका केली पण कोरोना वाढतो आहे त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला त्यामुळे या विषयावर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये
कोरोना पार्श्वभूमीवर कुणीही मास्क घालत नाही हे अत्यंत घातक आहे, याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, राज्यात कोरोनाची मोठी वाढ होत आहे.
यावर्षी भरीव निधी द्यायला आम्हाला मर्यादा आहेत. कोरोनामुळे उत्पन्न झालेलं नाही, आणि केंद्राकडून 28 हजार कोटी रुपये मिळालेले नाहीत, पण तरीही आम्ही निधी कापला नाही
कोरोना बाबत काही कठोर निर्णय आम्हाला घ्यावे लागतील याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.
काही लोक कोरोनाबाबत नाहक राजकारण करत आहेत. शिवजयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला तर काही जण शिवजयंतीला बंधन का आणता अशी टीका केली पण कोरोना वाढतो आहे त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला त्यामुळे या विषयावर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये
15 हजार कोटी मराठवाड्यात विजबील थकबाकी आहे, राहिलेलं विजबील शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने दिलं पाहिजे, शेतकरी अडचणीत आहे पण सरकारने मदतही केली आहे. त्यामुळे विजबील भरलं पाहिजे, यातही काहीजण राजकारण करत आहेत. पण तरीही यावर काही पर्यायी मार्ग काढता येते बघू त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ
8 मार्चला या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करू
कोरोना पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना नियमावली लावली पाहिजे मी मुंबईला गेल्यानंतर राज्य प्रमुखांशी बोलून तातडीने निर्णय घेऊ तसेच
संभाजी पाटील निलंगेकर माघे मंत्री होते, त्यांचं सरकार होतं केंद्रात होतं तेंव्हा काही केलं नाही आणि आता ढुसण्या मारतात हे धंदे बंद करा, संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर टीका
