जनतेज न्युज

कोरोना लसीकरणाची प्रतीक्षा संपली, प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात.

प्रतिनिधी , जालना : राज्यात लसीकरणाच्या प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे, आणि आता सामान्य लोकांच्या लसीकरणाला तीन ते साडेतीन महिन्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणानंतर लवकरच होणार आहे असे मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. आज जी आपण लसीकरणाला सुरुवात केली आहे ती सगळ्या लाभार्थ्यांसाठी मोफतच आहे. केंद्राने लसीकरणाचा पुरवठा हा जरी 60 टक्के केला असेल तरी राहिलेला 40 टक्के लसीकरण याचा पुरवठा लवकरच करतील अशी मला अपेक्षा आहे, कारण आपल्या राज्याची डिमांड साडेसतरा लाख लसीकरण आहे, आज रोजी आपल्याला 9 लाख 80 हजार डोस आलेले आहे, म्हणजे साडेसात लाख आणखी आपल्याला येणे आहे व ती लवकर येतील अशी मला खात्री आहे .

आरोग्य कर्मचारी, डॉक्टर , वॉर्ड बॉय, ॲम्बुलन्स चालक, यांनी जे कोरोणा काळात आपले कर्तव्य योग्यरीत्या पार पाडले त्यांना माझा मनापासून सलाम. गोकरणा काळा ज्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी दिवस-रात्र एक केली त्यांना आपण आज देत आहोत.
त्यामुळे आता प्रतीक्षा संपली आहे प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात झाली आहे.