प्रतिनिधी , पुणे : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत डॉक्टरांची भरती करण्यात येणार आहे. पुणे आरोग्य विभागातील वर्ग-१ आणि २ च्या तब्बल १७८ जागा भरण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. याबाबतची जाहिरात येत्या दोन दिवसां त प्रकाशित केली जाणार आहे. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मुंबईनंतर पुण्यात पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिकेतील अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदांपैकी १ हजार ८६ पदे भरण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पुणे महापालिकेत डॉक्टरांची भरती केली जाणार आहे.
