प्रतिनिधी , 21 मार्च रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची अमरावती जिल्ह्यात प्रशासनाने संपूर्ण तयारी केलेली आहे जिल्ह्यात एकूण 36 परीक्षा केंद्रांवर 10 हजार 837 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत परीक्षा केंद्रांवर समन्वय अधिकारी, उपकेंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक, शिपाई, अशा जवळपास महसूल विभागातील अकराशे अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशी माहिती अमरावती जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ नितीन व्यवहारे यांनी दिली
