प्रतिनिधी , वाशिम: हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शिरपूर, केनवड,चाडस,काटा,कोंडाळ,
चिखली पंगरखेडा परीसरातील शेतशिवारात मोठया प्रमाणात गारपीट झाली आहे.या अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने काढणीला आलेल्या हळद, हरबरा,गहू,टरबूज, ज्वारी, मका केळी, पिकासह फळबागांचे व पॉलिहाऊस नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर हे निसर्गाचं पुन्हा संकट कोसळले आहे.
