जनतेज न्युज

गारगोटवाडी येथे पशू चिकित्सा व उपचार शिबीर संपन्न ;परिसरातील अनेक पशू पालकांनी घेतला लाभ

प्रतिनिधी , नांदेड : नांदेड जिल्ह्यातील गारगोटवाडी पां. ता. भोकर येथे आज (ता.२० ) रोजी सकाळी परिसरातील पशूंची चिकित्सा,उपचार व वंध्यत्व निवारण शिबीर घेण्यात आले.माझा गांव सुंदर गांव मोहिमे अंतर्गत गारगोटवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्या  अनुषंगाने येथे आज ता.२० मार्च रोजी पशू चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.तपासणी करण्यात आली. यावेळी पशूंमधील  वंध्यत्व निवारण,लसीकरण , आणि खच्चीकरण करण्यात आले.तसेच पशूंना जंत नाशक औषधही पाजण्यात आले.
 सदर गावातील पशूंसह  परिसरातील पशूंचीही तपासणी करण्यात आली . डॉ .बुन्नावार यांनी परिसरातील उपस्थित पशूपालकांना पशूंचे दुर्धर आजार, लसीकरण, आणि उपचारासंबंधी मार्गदर्शन केले . आपल्या पशूंची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले तर सदरील शिबिरात सर्व सातबारा धारक पशुपालकांना महामंडळ यांचे चारा बियानेही मोफत वाटप करण्यात आले.  
याप्रसंगी माझा गांव सुंदर गांव मोहिमेचे  समन्वयक गंगाधर वानोळे, तालुका पशूधन विकास अधिकारी  डॉ . अविनाश बुन्नावार, सरपंच कौशल्याबाई राठोड , उपसरपंच सुदाम टारपे, युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर वागत कर ,बालाजी टारपे आदी मान्यवरांसह अनेक पशुपालक उपस्थित होते .