जनतेज न्युज

कोरोनाच्या सावटा मुळे भुसावळच्या फटाके बाजारात मंदी

प्रतिनिधी , भुसावळ ॲकर:-कोरोनाच्या सावटामुळे भुसावळ बाजारपेठेमध्ये फटाक्यांच्या विक्रीत मंदीचे चित्र दिसत आहे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी फटाक्याच्या किमती 25 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फटाक्याच्या कंपनीत कामगार उपलब्ध न झाल्याने फटाक्यांची पाहिजे तसे उत्पादन झाले नाही त्यामुळे यावर्षी फटाक्यांच्या किमतीमध्ये 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे कोरोनाचे सावट अजूनही असल्यामुळे ग्राहक फटाकडे यावेळी आकर्षित झाले नसल्याने फटाक्यांच्या बाजारांमध्ये मंदी आहे दुकानदारांनी फटाक्यांचा माल विक्रीसाठी उपलब्ध केला असला तरीही पाहिजे त्या प्रमाणामध्ये ग्राहक नसल्याने फटाके विक्री त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे