जनतेज न्युज

गतिमंद मुलीवर दुष्कर्म ! पीडितेच्या त्रासानंतर घटना उघड

प्रतिनिधी , सोलापूर : जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मतिमंद मुलीवर अज्ञात इसमाने दुष्कृत्य केल्याने ती गरोदर राहिली.
संबंधित पीडितेला त्रास होऊ लागल्याने ही घटना कुटुंबियांसमोर उघड झाली. याबाबत अज्ञात इसमा विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दुष्कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील एका गावात एक कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते,
त्या कुटुंबामध्ये एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आहे.
ही मुलगी मतिमंद असल्याकारणाने लहान मुलांप्रमाणे वागते.
सदर कुटुंबातील इतर व्यक्ती मोलमजुरी करण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर ती मुलगी घरी एकटीच असायची.
तिच्या मतिमंदपणाचा 
अज्ञात व्यक्तीने फायदा उचलून तिच्याशी राहत्या घराच्या परीसरात दुष्कृत्य केले.
त्यातून संबंधित  पीडित अल्पवयीन मतिमंद मुलगी गरोदर राहीली.
पीडित मतिमंद मुलगी घरात व्यवस्थित जेवण करत नाही म्हणून तिच्या कुटुंबियांनी तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचे सांगितले.
त्यानंतर त्या कुटुंबियांनी तिला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले आहे.
मजुरी करिता कामानिमित्त घराबाहेर असताना अल्पवयीन मतिमंद मुलगी घरी एकटीच असताना
कोणीतरी अज्ञात इसमाने त्या एकटेपणाचा तिच्या मतिमंदपणाचा फायदा घेवुन तिच्यावर बलात्कार केला आहे. त्यामुळे ती गरोदर राहीली आहे. अशा आशयाची फिर्याद पीडित मुलीच्या भावाने मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
या घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.
संबंधित आरोपीला मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.