प्रतिनिधी , उंब्रज : दिवाळीच्या पहिल्या दिवशी साताऱ्यात वाशीवरून गोव्याला जाणाऱ्या 5 जणांवर काळाचा घाला… पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज गावच्या तारळी पूलाचा कठडा तोडून चाळीस फूट ट्रॅव्हलर बस पडून झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांमध्ये एक महिला आणि तीन वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. हा अपघात पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि उंब्रज पोलिस यांचे तातडीने मदत कार्य असून जखमींना उपचारासाठी सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे…
