· तीन ठिकाणी होणार ड्राय रन
· 75 व्यक्तींचा समावेश
प्रतिनिधी , कोरोना प्रतीबंधक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी जिल्हा रूग्णालय भंडारा, उपजिल्हा रूग्णालय तुमसर व प्राथमिक आरोग्य केंद्र धारगाव येथे शुक्रवार 8 जानेवारी 2021 रोजी कोविड 19 लसिकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) आयोजित केली आहे. ड्राय रनसाठी भंडारा जिल्हा सज्ज झाला असून जिल्हा रूग्णालय भंडारा, उपजिल्हा रूग्णालय तुमसर व प्राथमिक आरोग्य केंद्र धारगाव येथे प्रत्येकी 25 अशा एकूण 75 लाभार्थ्यांचा समावेश असणार आहे. रंगीत तालीममध्ये लस न देता लसीकरणासाठीची संपूर्ण प्रक्रीया राबविली जाणार आहे.
लसीकरणासाठी पहिल्या टप्यात 7 हजार 608 हेल्थ केअर वर्करला लस दिली जाणार आहे. लाभार्थ्यांची को-विन ॲपवर नोंदणी झाली आहे. शासकीयसह खाजगी रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा यात समावेश असणार आहे.
