जनतेज न्युज

खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या उपोषण समर्थनार्थ उद्या उस्मानाबाद जिल्ह्यात गावापासुन शहरापर्यत लाक्षणिक उपोषण, मागण्या मान्य होईपर्यत मंत्र्यांना जिल्हा प्रवेश बंदी – राणाजगजितसिंह पाटील

प्रतिनिधी, उस्मानाबाद : खा छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्या राज्य सरकारकडे केल्या होत्या परंतु त्या पुर्ण न झाल्याने खा छ्त्रपती संभाजीराजे उपोषणास बसले आहेत त्यांच्या समर्थनार्थ भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापुरात लाक्षणीक उपोषण केले . यावेळी आनेक समाज व राजकिय पक्षांनी पाठींबा दिला या वेळी मार्गदर्शन करताना ठाकरे सरकार छत्रपतींना दिलेला शब्द पाळत नसुन सर्वच समाजाची दिशाभूल करत आहे . आंदोलनाकडे जाण्यासही त्यांना वेळ नाही हे दुर्दैव म्हणुन उद्या उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायत कार्यालय , जिल्हाधिकारी , उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून दुपारी पुन्हा पुढील दिशा ठरऊ असे सांगत सत्ताधारी आमदार , खासदारांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन जिल्ह्यातील समाजप्रतीनीधींची भेट घालून द्यावी असे अवाहन करत छत्रपतींच उपोषण संपेपर्यंत कोणत्याही मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही मोठया रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला आहे .