जनतेज न्युज

खावाले काळ आणि भुईला भार म्हणजे ठाकरे सरकार . आ आशिष शेलार …

प्रतिनिधी ,नंदुरबार : महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आता पर्यंत मंत्रालय पर्यंत देखील पोहचले नाही तर अतीदुर्गम भागात काय पोहचतील .एक अभर्द्र युती ही महाराष्ट्रात बनली आहे जे आपसात लढले ते कट कमिशन साठी एकत्र येऊन सत्तेत आले आहेत ते जनतेचे काय भलं करतील असे आ आशिष शेलार यांनी सांगितले .
ग्रामीण भागात केंद्रीय योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार पोहचले परंतु महाराष्ट्र मधील सरकार ग्रामीण भागात कधी पोहचेल असा प्रश्न जनता विचारत आहे .नंदुरबार जिल्हात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीआहे ,शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे .बँका ही पीक कर्ज देण्यासाठी आखडता हात घेतला असतांना शासन व जिल्ह्याचे पालकमंत्री झोपले आहेत का .त्यांना जागे करण्याची वेळ आली आहे.आदिवासी भागातील बांधवासाठी खावटी किट मिशन घेऊन पालकमंत्री आले आहे . परंतु खावटी किट ची गुणवत्ता पाहिली असता आदिवासी विकास मंत्री खावटी किट चे मिशन नव्हे तर खावटी कट कमिशन घेऊन आले आहेत .अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य आदिवासी बांधवांना देण्यात येत आहे .ही स्थिती आणि चित्र बदलावे लागेल अन्यथा भारतीय जनता पक्ष नंदुरबार जिल्हात आक्रमक पाऊल उचलेल अशी माहिती आ आशिष शेलार यांनी दिली…