जनतेज न्युज

खासगी रुग्णालयांत लशींचा तुटवडा…

प्रतिनिधी , कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील करोना लसीकरण केंद्र असलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून लशीचा तुटवडा जाणवत आहे.

कल्याण -डोंबिवली महापालिका हद्दीतील करोना लसीकरण केंद्र असलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून लशीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नोंदणीकरण करून खासगी रुग्णालयात जाणाऱ्या ज्येष्ठांना लस उपलब्ध नाही म्हणून घरी परतावे लागत आहे. लशीचा मुबलक साठा नाही म्हणून डोंबिवलीतील खासगी रुग्णालयाने लसीकरण बंद ठेवले .

:-मागील दोन महिन्यांपासून कल्याण, डोंबिवलीत महापालिकेच्या रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर येथे अत्यावश्यक सेवा कर्मचारी, सामान्यांसाठी करोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे करोना प्रतिबंधासाठी आघाडीवर काम करणारे कर्मचारी यांच्यासाठी लसीकरणासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोजक्याच ठिकाणी यापूर्वी करोना लशीचे लसीकरण सुरू असल्याने उपलब्ध लशीचा साठा नोंदणीकरण केलेल्या ज्येष्ठांना देणे पालिकेला शक्य होत होते. गेल्या आठवडय़ापासून पालिका हद्दीत डोंबिवलीत एम्स, आर. आर., टिटवाळा येथील श्री महागणपती, ईशा नेत्रालय या चार खासगी रुग्णालयांनी करोना लसीकरण शासन मान्यतेने सुरू केले आहे. पाथर्लीतील शाळा क्र. ६२, कल्याणमध्ये आर्ट गॅलरीमध्ये पालिकेने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रांमध्ये शासन नियमानुसार ज्येष्ठ, सहव्याधी असलेल्या रहिवाशांना लसीकरण केले जाते. खासगी रुग्णालयांना पालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या भांडार कक्षातून लशीच्या कुप्या दिल्या जातात. मात्र गेले काही दिवसा पासून लशींचा तुटवडा असल्याने महानगर पालिकेच्या वैद्यकीय विभागाने खासगी रुग्णालयाना लशीच्या कुप्या देने थांबवल्याने लस न मिळाल्याने कल्याण डोंबिवलीत अनेक खासगी रुग्णालयाने लसीकरण बंद ठेवले रहिवासी वर्गात नाराजी व्यक्त करीत आहेत. तर पालिका रुग्णालयांमध्ये मोफत करोना लस मिळत असल्याने या ठिकाणी सर्वाधिक गर्दी होत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण देने बंद केले होते मात्र आता सर्वांना लशीं पुरवल्या असून आता सर्वत्र लशी करण सुरळीत सुरू असल्याचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे वेधकीय अधिकारी डॉ पानपाटील यांही सांगितले