राज्यातील पूर परिस्थिती माहिती देत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी
प्रतिनिधी :-राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं,हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावुन नेला त्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देशाचे कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील पूर परिस्थितीची माहिती दिली, पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर३०हजार रुपये नुकसान भरपाई देऊन केंद्र सरकारने राज्य सरकारला मदत करण्याची मागणी नवनीत राणा यांनी कृषी मंत्री तोमर यांच्याकडे केली, तर जुलै ते ऑगस्ट महिन्यात सोयाबीनला 10 हजार रुपये भाव होता मात्र केंद्र सरकारने सोयाबीन आयात केले ती आयात केंद्र सरकारने थांबवण्याची मागणी करत सोयाबीनला १०हजार रुपये भाव कायमस्वरूपी ठेवण्याची मागणीही नवनीत राणा यांनी केली यावेळी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली व शेतकऱ्यांना दिलासा नक्कीच या भेटीतून मिळणार असल्याचे राणा यांनी सांगितले
