प्रतिनिधी , जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन यांच्या वर ऍड विजय पाटील यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आता जामनेर चे नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेत विविध आरोप केले आहेत यावेळेस आपल्या कडे पुराव्या दाखल सीडी आणि पेन डाईव्ह असून योग्य वेळ आल्यास आपण ते उघडक करू असे वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे
भाजपा नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सह काही जणांच्या विरोधात नुकताच ऍड विजय पाटील यांनी गुन्हा दाखल केला आहे या घटने नंतर ऍड विजय पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेत गिरीश महाजन यांचा आपली संस्था बळकावण्या चा डाव असल्याचा आरोप केला होता शिवाय सत्तेत असताना पोलीस यंत्रणेचा वापर करीत त्यांनी आपल्या सह अनेक जणांच्या वर विविध आरोप देखील केले होते
त्यांच्या या पत्रकार परिषदे नंतर जामनेर चे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी आज जामनेर येथे पत्रकार परिषद घेत गिरीश महाजन यांच्या वर विविध आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत या वेळी बोलताना पारस ललवाणी यांनी म्हटलं आहे की बी एच आर पत संस्था प्रकरणात बी एच आर पत संस्थेच्या जमिनी गिरीश महाजन यांनी अतिशय कमी दरात आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खरेदी केल्या आहेत ,या सोबतच अनेक संस्था बळकावण्या साठी संस्थेचा अनेक पदाधिकार्यनावर त्यांनी पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास दिला आहे पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्याटर्न गिरीश महाजन यांनी राज्यभरात पसरविला आहे,अनेक विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरीस आणण्याचं काम महाजन यांनी करून कार्यकर्त्याना भाजपा मध्ये येण्यासाठी भाग पाडले असल्याच ललवाणी यांनी म्हटलं आहे
जामनेर पालिकेत ही 41 टक्के जास्तीचे टेंडर भरून त्यांनी जनतेची फसवणूक केल्या चा प्रकार साधना महाजन यांच्या काळात सुरू असल्याच म्हटलं आहे,
ऍड विजय पाटील यांनीही गिरीश महाजन यांच्या विरोधात पुरावे असल्याची आपल्या कडे सीडी असल्याचे म्हटलं होते
त्याच धर्तीवर आज पारस ललवाणी यांनी ही आपल्या कडे ही पुरावे असलेली सीडी आणि पेन ड्राइव्ह आहे ,गिरीश महाजन यांच्या कडून काही त्रास झाल्यास मात्र आपण ही सीडी जाहीर करू अस म्हटलं आहे मात्र या सीडी।मध्ये नक्की काय आहे आणि कोणाच्या विरोधात पुरावे आहेत या बाबत मात्र अधिक बोलणे टाळले असून पुढील काळात सर्व सत्य समोर येईल असं म्हटलं आहे
ऍड विजय पाटील आणि पारस ललवाणी यांच्या कडे असलेल्या सीडी मध्ये नक्की काय आहे आणि कोणाच्या विरोधात पुरावे आहेत ते कधी उघड होणार याचीच आता राजकीय गोटात चर्चा होतांना दिसून येत आहे
