प्रतिनिधी , पुणे : केंद्र सरकारने संपूर्ण भारतात वाढवलेल्या गॅस सिलेंडरच्या दरवाढीविरोधात रस्त्यावरती चूल मांडून भाजी-भाकरी करून अनोखे आंदोलन करण्यात आले. सर्वसामान्य महिलांना या महागाईच्या दिवसात घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाजवीरित्या वाढल्याने गोरगरिबांचे अतोनात हाल होत आहेत. तर या मोदी सरकारने ही वाढलेली दरवाढ कमी करावी या मागणीसाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
