जनतेज न्युज

गोदावरी नदीच्या ब्याक वाटरमुळे शकडो हेक्टर जमिन पाण्याखाली

प्रतिनिधी , नांदेड जिल्ह्यातील कुंटूर ता.नायगाव परिसरातील जनजिवन विस्कळीत झाले असून.गोदावरी नदीच्या ब्याक वाटरमुळे कुंटूर परिसरातील शकडो हेक्टर जमिनी पाण्याखाली जावून पिकांचे अतोनात नुकसान झाले असून,गोदावरी नदीच्या ब्याक वाटरच्या पाण्याने कुंटूर ,सांगवी,धंनज इकळीमाळ,सातेगाव,बळेगाव,आदी गावाना पावसाचा फटका बसला आहे.कुंटूर गावचा संपर्क तुटला असून परिसरातील ७०%जमीन पाण्याखाली जावून   पिकाचे अतोणात नुकसान झाले तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा असून. शेतकऱ्यांनी जनावरे न्यायच कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.गोदावरी नदीच्या बऱ्याक वाटर पाण्यामुळे  दरवर्षीच शेतीचे नुकसान  होत.असल्याने शासनाने आमच्या जमीनीचा मोबदला तातडीने देण्यात यावी अशी मागणी तेथील शेतकऱ्यांकडून केली जाते.