प्रतिनिधी , मुंबई : गोरेगांव पोलीस ठाणे , मुंबई दि .२६ / ०२ / २०२१ – : प्रेस नोट बांगुरनगर पोलीस ठाणे , मुंबई गुनोंक ६३ / २०२१ कलम ३०२,५०६ ( २ ) .३४ भादवि मधील हकीकत अशी की , रूमानिया हॉटेल समोर , लिक रोड , गोरेगांव पश्चिम , मुबई याठिकाणी दुपारी ०३.१५ वा चे सुमारास तीन अनोळखी इसमांनी अज्ञात कारणांवरून सुरेश उर्फ सुन्या प्रभू मस्तूद , वय ४३ वर्षे याच्या डोक्यावर हातोडयाने मारून व छातीवर , पोटावर चाकूने वार करून जिवे ठार मारले . तसेच साक्षीदार शरीफ कुरेशी व घटनास्थळावर हजर असलेल्या लोकांना चाकूचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता . सदर गुन्हयाचे स्वरूप गंभीर असल्यामुळे तसेच सदर घटना दिवसा ढवळया रहदारीच्या रस्त्यावर घडली असल्यामुळे नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे मा . पोलीस उपायुक्त , परिमंडळ -११ , सहायक पोलीस आयुक्त , गोरेगाव विभाग व वरिष्ठ पोलीस निरीक्षक , गोरेगाव पो . ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि ( गुन्हे ) ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली यातील पाहिजे आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके स्थापन केली . तांत्रीक तपास व गुप्त बातमीदाराच्या मदतीने पाहिजे आरोपींची ओळख पटवून त्यांची नावे निष्पन्न केली . पाहिजे आरोपींनी त्याच्याकडील मोबाईल नंबर घटनेच्या वेळेपासून बंद करून मुंबई शहराबाहेर पळून गेले असल्यामुळे त्यांचा शोध घेणे हे पोलीसांसमोर एक आव्हान निर्माण झाले होते . त्यानंतर नमूद पथकाने लांत्रीक कौशल्याच्या आधारे व गुप्त बातमीदारांच्या सहायाने पाहिजे आरोपींना तात्काळ दोन पथकाने सापळा रचून ०४ आरोपींना शिताफीने ताब्यात घेवून गोरेगाव पोलीस ठाणेस आणले . त्याच्याकडे नमूद गुन्हयाच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्यांच्या नमूद गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने सदर ०४ आरोपींना पुढील तपासकामी बांगुरनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कामगिरी मा . अपर पोलीस आयुक्त , उत्त प्रादेशिक विभाग , श्री . दिलीप सावंत , मा . पोलीस उप आयुक्त , परिमंडळ -११ . श्री . विशाल ठाकूर , मा . सहा . पोलीस आयुक्त , गोरेगाव विभाग , श्री . दिपक फटांगरे ; मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री . हरिष गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगांव पोलीस ठाणेचे पोनि ( गुन्हे ) महेशकुमार ठाकूर , गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा . पोलीस निरीक्षक , अभिजीत जाधव , सपोनि संदिप पाचांगणे व दोन्ही गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार पोह जाधव , पोना शेख , पोना पालांडे , पोशि लोणारे , पोशि शिंदे , पोशि ढोक , पोशि पाटील , पोशि कोळेकर , पोशि सावर्डे , पोशि राठोड यानी यशस्वीरित्या पार पाडली आहे .
