प्रतिनिधी, कल्याण : ल्याण पश्चिमेकडील गौरी पाडा येथील तलावात तब्बल 80 हुन अधिक कासव मृत्युमुखी पडल्याची घटना उजेडात आली होती .या कासवांचा मृत्यू चे कारण स्पष्ट करण्यासाठी वनविभागाने मृत कासव शवविच्छेदनासाठी पाठवले होते .या कासवांचे अहवाल प्राप्त झाले असून या मृत कासवांच्या व्हिसेरा तपासणीत या कासवाचा मृत्यू त्यांच्या पोटात घातक बॅक्टेरिया गेल्यानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत वन विभागाचे कल्याण वनसंरक्षक आर एन चन्ने यांनी अहवाल प्राप्त झाला असून याबाबत केडीएमसी ला पत्रव्यवहार करण्यात येणार आहे या तलावातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी तत्काळ पाऊल उचलण्यात येतील असे सांगितलं. कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या गौरीपाडा तलावात 22 जानेवारी रोजी काही कासव मृतावस्थेत आढळले होते .लागोपाठ दोन दिवसात तब्बल 80 कासव मृतावस्थेत आढळल्याने या कासवांचा मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले होते .प्राणीमित्र संघटना व वन विभागाने तत्काळ धाव घेत मृत कासवाचे मृतदेह तपासणीसाठी ताब्यात घेतले. या कासवांचा व्हिसेरा फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात आला होता यानंतर कासव कशामुळे दगावले त्याच्या कारणांची प्रतीक्षा सुरू होती.अखेर या व्हिसेरा तपासणीचा अहवाल वन विभागाकडे प्राप्त झाला असून या अहवालात कासवांचा मृत्यू घातक विषाणू पोटात गेल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान नोंदवण्यात आले आहे. दरम्यान पालिका प्रशासनाने या पाण्यात कोणताही घातक पदार्थ नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितल्याने आश्चर्य व्यक्त करन्यात येत आहे .याबाबत वॉर या संस्थेचे प्रेम यांनी तज्ञांच्या मते दूषित पाण्यामुळे बॅक्टेरियल इन्सफेक्शन होण्याची शक्यता आहे ,कासवाच्या संवर्धनासाठी सरंक्षनासाठी उपाययोजना करणे आवश्यक असून याबाबत केडीएमसी आणि वनविभागाला सूचना करण्यात येणार असल्याचे सांगितले.
