प्रतिनिधी , बुलडाना : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. बुलडाणा तालुक्यात 51 ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून, निवडणूकीसाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसिलदार रुपेश खंडारे यांनी दिली आहे…
व्हिओ- ग्रामपंचायत निवडणूक 2020-21 साठी तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीसाठी महिला आणि पुरुष असे एकूण 1 लाख 40 हजार 644 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी 51 ग्रामपंचायतीसाठी एकूण सदस्य संख्या 513 आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 221 मतदान केंद्र आहे. 221 मतदान केंद्रनिहाय पथके तयार करण्यात आली आहे.तसेच 24 राखीव पथके तयार करण्यात आली आहे.एकूण ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी 1हजार पेक्षा जास्त लोक प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त केले आहे. आणि नियोजनासाठी 300 कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक वेगळे धरुन जवळपास दीड हजार कर्मचारीवर्ग काम करीत आहे. बुलडाणा तालुक्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उदया सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. मतदानावेळी कुठलाही एक ओळखीचा पुरावा सोबत असावा लागणार आहे. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून मतदारांना निर्भिड वातावरणात मतदान करता यावे, यासाठी पोलीस विभाग सज्ज आहे. तरी मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडून भरघोस मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे..
