प्रतिनिधी , मुंबई : सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात सायबर गुन्ह्यात तिपटीने वाढ झाली आहे। कोरोना काळात हे गुन्हे वाढले असून, 232 सायबर गुन्हे दाखल आहेत, यातील फक्त 21 गुन्हे उघडकीस आले आहे ,211 गुन्हे अजून प्रलंबीत असल्याची माहीती पोलीस आयुक्त बीपीनकुमार सीह यांनी दिली, नवी मुंबई पोलिसांची वार्षिक पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी आयुक्तांनी माहीत दिली, 2019 च्या तुलनेत 2020 ला गुन्हमद्ये घट झाली असून 2020 ला 4331 गुन्हे दाखल झाले आहेत , 2019 पेक्षा 1256 ने कमी आहेत , लॉक डाउन मुळें इतर गुन्हयमद्ये घट झाली असली तरी सायबर क्राईम मद्ये प्रचंड वाढ झाली आहे , यात फेसबुक मैत्री चे -4 गुन्हे , ऑनलाईन फसवणूक- 109 गुन्हे ,कार्ड क्लोनिग -15 गुन्हे , ऑनलाईन नोकरीचे आमिष – 9 गुन्हे , ओटीपी कोड -55 गुन्हे , ओ ऐल एक्स वर – 32 गुन्हे दाखल आहेत।
गुन्ह्याचे प्रकार – 2019 – 2020
सायबर गुन्हे – 74 – 232
खून – 53 – 41
दरोडा – 6 – 5
चोरी – 548 – 356
बलात्कार – 169 – 125
मोटार अपघात गुन्हे – 501 – 330
