जनतेज न्युज

बुलडाणा पोलिस दलातील पोलिसांना नविन वर्षाची भेट… जिल्ह्यातील 186 पोलिस अमंलदारांना भेट म्हणून मिळाली पदोन्नती…

प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील 186 पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रमोशन करत जिल्हा पोलीस
अधीक्षकांनी त्यांना नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ही अनोखी भेट पोलिसांच्या कुटुंबियांना दिली आहे.अश्वासित प्रगती योजनेतील 1219 पोलीस अमंलदारांना बढती देण्यात आली आहे. तसेच 15 मंत्रालयीन तर 4 पोलीस अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. बढती मिळाल्यामुळे वेतनश्रेणीत ही वाढ होणार असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहचे वातावरण दिसत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी प्रमोशन देण्यात
आलेल्या सर्व पोलिसांचे व कुटुंबियांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या आहेत.