प्रतिनिधी, मुंबई : शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ज्या आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी केली आहे त्यांच्या विरोधात आता शिवसैनिक आक्रमक होत आहे. घाटकोपर रेल्वे स्थानक जवळ ईशान्य मुंबई विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी या आमदारांच्या विरोधात आंदोलन केले.या आमदारांची आणि एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करण्याची मागणी या आंदोलनात शिवसैनिकानी केली.आम्ही उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत आहोत त्यांनी अश्या गद्दारांची हकालपट्टी करावी अशी मागणी या वेळी या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
