प्रतिनिधी, बुलडाणा : “प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं” असं आपण बऱ्याचदा ऐकत असतो, मात्र बुलडाणा जिल्ह्यातील तरुणाने प्रेयसीच्या प्रेमापायी आणि तिचे लाड पुरवण्यासाठी चक्क चोऱ्या करण्याचा मार्ग अवलंबला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय… प्रेमापोटी वेडं लागलेल्या या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत… तर त्याच्या सहकाऱ्यांनी देखील मौज मजा करण्यासाठी अनेक चोऱ्या केल्या आहेत…
12 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरणाऱ्या चार युवकाचा शेगाव शहरातून मुसक्या आवळल्या होत्या, आणि त्यांच्याकडून दुचाकीचा सह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता, या आरोपींच्या चौकशी दरम्यान शेख शाहरुख शेख फिरोज याने अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे, यामध्ये तो आपल्या प्रेयसीची मागणी पूर्ण करण्यासाठी चोरी करण्याकडे वळाला असल्याचे त्याने सांगितले आहे , आपल्या प्रेमापोटी, प्रेयसीला महागड्या किमतीच्या आणि आकर्षक वस्तू भेट देण्यासाठी तो चोरी करायचा, त्यामुळे प्रेमात सर्व काही माफ असतं हा गैरसमज पोलिसांनी खोडून काढलीये.तर इतर तरुणांनी आता ही घटना पक्की लक्षात ठेवणे अतिशय गरजेचे आहे.हा तरुण एवढ्यावरच न थांबता काही दिवसानंतर प्रेमाचा भंग झाल्याने तो चोरी सह, दारू, गांजा, जुगार याच्या व्यसनाधीन झाला, अशी कबुली त्याने स्वतः दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेले शेख शाहरुख शेख फिरोज, शेख मोबीन शेख हरून, अमान खान असलम खान, मुंसिफ खान अल्ताफ खान हे चारही आरोपी प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याचे चौकशीतून समोर आले आहे, यातील शेख शाहरुख हा प्रेमात पुरता बुडाल्याने प्रेयसीला आकर्षित करण्यासाठी महागडी दुचाकी, तेवढाच महागडा मोबाईल, आणि उच्च प्रतीचे कपडे परिधान करण्याची त्याची हाऊस त्याला जडली होती, ही त्याची जीवनशैली जपण्यासाठी त्याने चोरी करणे हा एकमेव मार्ग निवडल्याचे निष्पन्न झाले आहे, हे चारही तरुण शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरून दुचाकी लंपास करत होते, या दुचाकी विकत घेणाऱ्या व्यक्तींच्या कुंडल्या देखील स्थानिक गुन्हे शाखेने काढल्या असून, त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती आहे.आतापर्यंत पोलिसांनी यातील सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांसोबत सुसंवाद ठेवून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे…
